शालेय विद्यार्थ्यांना शुल्क माफी देण्याच्या मागणी साठी छात्रभारतीचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यासमोर आंदोलन..

मुंबई:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या पालकांना व विद्यार्थ्यांना शुल्क माफी देण्यासह इतर मागण्यांसाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला.
आज बुधवारी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी थेट राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या सरकारी बंगल्यासमोर आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करत अटक केली. वारंवार निवेदन देऊनही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याची दखल न घेतल्यानं हे आंदोलन केल्याचं छात्रभारतीने म्हटलंय. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.
पहा व्हिडियो:-
https://youtube.com/shorts/acIr6dWliFg?feature=share