सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये म्हणून’हा’ केंद्रीय मंत्री झाला झारीतला शुक्राचार्य -खासदार विनायक राऊत
स्वतः च्या खासगी वैद्यकीय रुग्णालयावर परिणाम होउ नये म्हणून खटाटोप

सिंधुदुर्ग :जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावरुन शिवेसना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर परत एकदा कडवट टीका केली आहे.
सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये म्हणून या जिल्ह्यातील दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करणारा केंद्रीय मंत्री खरा झारीतला शुक्राचार्य असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी नारायण राणें यांचे नाव न घेता म्हटले आहे.
सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालया बाबतचा खरा झारीतील शुक्राचार्य हा जिल्ह्याचे नवी दिल्लीत प्रतिनिधीत्व करणारा केंद्रीय मंत्री आहे. अलिबाग, पुणे इथल्या वैद्यकीय महाविद्यालयांपेक्षा सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा चांगल्या आहेत. मात्र, सिंधुदुर्गमधील त्या मंत्र्याच्या खासगी वैद्यकीय रुग्णालयावर परिणाम नको म्हणून परवानगी नाकारली जात आहे.
सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पुन्हा केंद्रीय मेडिकल असेसमेंट रेकींग बोर्ड (MARB) ने त्रुटी काढल्या असून परवानगी नाकारली आहे. मात्र, या सर्व प्रकरणात खरा झारीतला शुक्राचार्य या जिल्ह्यातील दिल्लीमध्ये जे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री आहेत आपल्या मंत्री पदाचा दुरुपयोग करून आणि आपल्या कॉलेजवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परवानगी मध्ये अडचणी आणायचे काम केंद्रीय मंत्र्याच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.