महाराष्ट्रमुंबई

स्वेट ऑन स्ट्रीट ५.० मध्ये दिंडोशीवासियांची धमाल

स्वेट ऑन स्ट्रीट सारख्या मेगा स्ट्रीट फेस्टीव्हलच्या माध्यमातून मुंबईतील रस्त्यांवर मुंबईकर जनतेला मोकळा श्वास घेता येतो! - आदित्य ठाकरे

मुंबई प्रतिनिधी – युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत प्रभू यांच्या पुढाकाराने केल्या जाणाऱ्या रहदरीमुक्त रस्त्यावरील स्वेट ऑन स्ट्रीट कार्यक्रमाचा मनमुराद आनंद दिंडोशीकर नागरिक प्रतिवर्षी लुटतात. दिंडोशीच्या रहेजा गार्डन येथील सुमारे एक किलो मीटर रहदरीमुक्त रस्त्यावर चिमुरड्यांसह सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी हा कार्यक्रम आयोजीत केला जातो.

हे सलग पाचवे वर्ष असल्याने बहुप्रतिक्षित स्वेट ऑन स्ट्रीट ५.० या नव्या रुपासहअपडेटेड व्हर्जन आज दिनांक १९ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात आला. या मध्ये सर्व वयोगटासाठी झुंबा, खेल-ओ-कबड्डी, कमांडोज-एक्स-फॅक्टर, रिंग फुटबॉल, जिम-फिट-मॅनिया, बिग साइज गेम्स, मिस्ट्री एस्केप रूम क्रिकेट, बुल राईड, ३६० सेल्फी स्टँड, आर्ट स्टेशन, बॅडमिंटन, कूंग- फू, कराटे, स्केटिंग, बुद्धिबळ, असे वेगवेगळे खेळ, व्यायाम व फिटनेस प्रकार, नृत्य, संगीत, चित्रकला, हस्तकला, कॅनव्हास पेंटिंग, थिएटर वर्कशॉप, योगाची प्रात्यक्षिके, एक्सपिरियंस रूम, ब्रह्मकुमारीचे मानसिक स्वास्थ्य कसे मिळवायचे आणि आलेल्या अडचणींवर कसे मिळवायचे यावर उपाय आदी कलागुणांना वाव देणारे साठ पेक्षा जास्त उपक्रम उपलब्ध होते. 

या कार्यक्रमाचा आनंद रहेजा हाईट्स, वसंत व्हॅली, गोकुळ धाम, म्हाडा संकुल, न्यू म्हाडा, सॅटेलाईट कॉलनी, यशोधाम व्हॅलेंटाईन अपार्टमेंट, नागरी निवारा संकुल, सुचिधाम, दिंडोशी वसाहत, शिवशाही, श्रीकृष्ण, नगर संतोष नगर, कूरार गाव इत्यादी वसाहतीतील दिंडोशीवासी प्रतिवर्षी घेतात. मुळातच सध्या मुंबईमध्ये कमी झालेली मैदाने, मोकळ्या जागा नसल्यामुळेच मुलांना त्यांना खेळायला आणि त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळत नाही आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन युवासेना, भारतीय विद्यार्थी सेना आणि स्वेट ऑन क्लब यांनी हा उपक्रम येथे राबवला. आम्ही हाती घेतलेल्या उपक्रमाची पोचपावती हि या कार्यक्रमाला प्रतिवर्षी जमणारी गर्दी हि आहे असे युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित सुनील प्रभू यांनी नमूद केले असून सर्वांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, असे मेगा स्ट्रीट फेस्टीव्हल मुंबई मधील गल्ल्या आणि रस्त्यांवर आयोजित करण्यात यावेत जेणेकरून मुंबईतील रस्त्यांवर मुंबईकर जनतेला मोकळा श्वास घेता येईल! यावेळी शिवसेना नेते, आमदार सुनिल प्रभु, अनंत (बाळा) नर, महेश सावंत, सचिन अहिर, सुप्रदा फातर्फेकर, साईनाथ दुर्गे, पवन जाधव यांच्या सह सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक तरुण तरुण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Box –
स्वेट ऑन स्ट्रीट ५.० मध्ये मराठी संगित मानापमान व फसक्लास दाभाडे, ईलू इलू १९९८ या चित्रपटांचे प्रमोशन करण्यात आले. चित्रपट कलावंतांनी उपस्थितांसोबत संवाद साधला, चित्रपटांचा ट्रेलर सिने अभिनेत्यांच्या उपस्थितीत दाखविण्यात आला व चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. यावेळी मराठी सिने अभिनेते सुबोध भावे, सुमित राघवन, क्षिती जोग, अमेय वाघ, हेमंत ढोमे, एली आवराम, अंकिता दांडे यांच्यासह सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!