नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम,अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली

सिंधुदुर्ग:- संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून, अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.आज न्यायालयात सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान, नितेश राणे प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी नोटीस बजावली होती. तसेच दुपारी ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितलं होते. मात्र, राणे हजर न झाल्याने ही नोटीस नारायण राणे यांच्या घरावर चिटकविण्यात आली.
दरम्यान,या प्रकरणावरील सुनावणी आता उद्या गुरुवारी (दि.३०) होणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून उद्या न्यायालयात नेमके काय घडते ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
नारायण राणेंनी लिहिले पोलिसांना पत्र:-
मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही, असे उत्तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली पोलिसांना पत्राद्वारे दिले आहे. राणे यांना कणकवली पोलिसांनी आज दुपारी ३ वाजता चौकशीसाठी हजर रहा, अशी नोटीस दिली होती.