घोटाळेबाजांकडून फसवणूक टाळण्यासाठी आपले आधार लॉक करा आणि गरज असेल तेव्हा अनलॉक करा,वाचा फायदेशीर माहिती

नवी दिल्ली:- आधार कार्ड हे शासकीय कागदपत्रांमधलं अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. आज या आधार कार्डच्या मदतीने आपण अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो. पॅनकार्ड काढण्यापासून ते आयटी रिटर्न भरण्यापर्यंत,तसेच बँकेत अकाउंट उघडण्यापासून ते योजनांचा लाभ घेण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आधार कार्ड महत्त्वाचे आहे.
मात्र, याच आधार कार्डच्या मदतीने अनेक घोटाळेबाज गैरफायदा घेऊन आपली फसवणूक करू शकतात. ही फसवणूक टाळण्यासाठी आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नागरिकांना आधार कार्ड लोक आणि अनलॉक करण्याची सुविधा दिली आहे. याचीच माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
जेव्हा आपल्याला आधार कार्डची गरज आहे त्या वेळेस आधार कार्ड अनलॉक करून आपण त्याचा वापर करू शकतो. जेव्हा आपल्याला गरज नसेल तेव्हा आपण आधार कार्ड लॉक करून सुरक्षित ठेवू शकतो. ही सुविधा स्वतः युआयडीएआयने दिली आहे.यामुळे कोणताही घोटाळेबाज तुमची फसवणूक करू शकणार नाही.
असे करा आधार कार्ड लॉक आणि अनलॉक:-
तुमचे आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करण्यासाठी तुम्हाला एक अतिशय सोपी प्रक्रिया फॉलो करावी लागेल. यासाठी, प्रथम My Aadhar या वेबसाईटवरील आधार सेवा विभागात जा आणि आधार लॉक आणि अनब्लॉक यापैकी एक पर्याय निवडा. पुढील पानावर ‘लॉक UID’ वर क्लिक करा. यानंतर तिथे आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा, जो १२ अंकी (UID) क्रमांक आहे.
आता वेबपेजवर तुमचे नाव आणि पिनकोड टाका. तुमची माहिती दोनदा तपासण्यासाठी सुरक्षा कोड वापरा. सुरक्षा कोड एंटर केल्यानंतर, तुम्हाला OTP आणि TOTP यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवर पाठवलेला OTP एंटर करा. तुमचा आधार लिंक केलेला नंबर तिथे प्रविष्ट केला जाईल.आणि तुमचे आधार कार्ड लॉक किंवा अनलॉक होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही uidai.gov.in ला भेट देऊ शकता.