१ मे नंतर पुढील १५ दिवस लॉकडाऊन कायम ?
मुंबई,दि.२८:राज्यात ३० एप्रिल पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. १ मे नंतर पुढील १५ दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे,असे खात्रीलायक सुत्रांकडून कळते.
१५ मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली
सध्या आपण ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. त्यासंदर्भात देखील मंत्रीमंडळात चर्चा झाली. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन वाढवावाच लागेल, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे.मंत्रीमंडळाने त्यासंदर्भात देखील चर्चा केली आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे ३० एप्रिलला नक्की १५ दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाउनमध्ये नक्कीच वाढ होणार आहे आणि ती किमान १५ दिवसांची होईल असा माझा अंदाज आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.