शासकीय अध्यादेश

अंतर सांगणारे मैलाचे दगड वेगवेगळ्या रंगांनी का रंगवलेले असतात? जाणून घ्या कारण…

एखाद्या रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्याच्या कडेला किलोमीटरचे आकडे दाखवण्यासाठी लावलेले दगड आपलं लक्ष्य वेधून घेतात.तुम्हाला माहिती आहे का, प्रवासाला जाताना या दगडांच्या रंगांवरून अंतरासोबत रस्त्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. या दगडांना मैलाचे दगड म्हणतात. शहराचे नाव आणि अंतर दर्शवलेल्या या दगडांचे रंग वेगवेगळे का? निळा, पिवळा, हिरवा, नारंगी अशा वेगवेगळ्या रंगांनी या दगडांचे शेंडे का रंगवलेले जातात? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील चला तर मग जाणून घेवूयात याच बाबत..

किलोमीटरचे आकडे दाखवण्यासाठी असणारे हे दगड रंगवण्यामागे खास कारणं आहे. हा प्रत्येक रंग काहीतरी सांगत असतो. किलोमीटरचे आकडे दाखवणाऱ्या दगडांचा वरचा भाग वेगवेगळ्या रंगाने रंगवण्याला एक विशेष अर्थ आहे.चला तर जाणून घेऊयात कोणत्या रंगाच्या दगडाचा काय अर्थ असतो.

हिरवी पट्टी असलेले माइलस्टोन हिरवा-पांढऱ्या रंगाचा मैलाच्या दगडाचा अर्थ असा होतो की, तुम्ही राज्य महामार्गावरून प्रवास करत आहात. हे रस्ते राज्यातील विविध शहरांना एकमेकांशी जोडतात. २०१६ च्या आकडेवारीनुसार, भारतातील राज्य महामार्गाचे जाळे १ लाख ७६ हजार १६६ किलोमीटर पसरलेले आहे.

काळी किंवा निळी पट्टी असलेले माइलस्टोन्स प्रवासादरम्यान निळ्या आणि पांढऱ्या किंवा काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा दगड दिसल्यास तुम्ही एखाद्या शहरी किंवा जिल्हा मार्गावर आहात, असं समजावं. भारतात अशा रस्त्यांचे जाळे ५ लाख ६१ हजार ९४० किमी आहे.

पिवळ्या रंगाची पट्टी असलेले माइलस्टोन्स पिवळा-पांढऱ्या रंगाचा मैलाचा दगड राष्ट्रीय महामार्ग दर्शवण्यासाठी वापरला जातो. जेव्हा तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असाल, तेव्हा तुम्हाला अनेकदा मैलाच्या दगडावर फिकट पिवळे पट्टे दिसतील.नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारतातील राष्ट्रीय महामार्ग १ लाख ५१ हजार १९ किमी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!