मोठी बातमी ! टी20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना

जगभरात चर्चेत असलेला क्रिकेटचा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. काही महिन्यांपूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगला आणि भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, आता याचा बदला घेण्याची आणि पाकिस्तानला पराभूत करण्याची संधी भारताकडे चालून आली आहे.कारण,पाकिस्तान बरोबर पुन्हा एकदा भारताचा सामना रंगणार आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या यंदाच्या T20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातील करोडो चाहत्यांना आकर्षित करणारा भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना ऑस्ट्रेलियात नव्यानं रंगणार आहे.
यंदाच्या ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकानुसार भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना २३ ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात रंगणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
याचसोबत भारताविरुद्धच्या इतरही सामन्यांचे वेळापत्रक पाहुयात
- भारत विरुद्ध पाकिस्तान २३ ऑक्टोबर – मेलबर्न
भारत विरुद्ध ग्रुप ए रनर अप २७ ऑक्टोबर – सिडनी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ३० ऑक्टोबर – पर्थ
भारत विरुद्ध बांगलादेश २ नोव्हेंबर – एडिलेड
भारत विरुद्ध ग्रुप बी विनर ६ नोव्हेंबर – मेलबर्न