‘ट्रॉमा आयसीयू’-विधानसभेत आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केला प्रश्न

जोगेश्वरी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातील आयसीयू वारंवार बंद पडत असून, २१ फेब्रुवारीपासून ते अद्याप सुरू झालेले नाही. याविषयी बुधवाराच्या विषयीला वाचा फोडल्यानंतर आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला.
यासंदर्भात आमदार सुनील प्रभू यांनी बुधवारी विधानसभेत मुद्दा उपस्थित करत आरोग्यमंत्र्यांनी तातडीने आयसीयू सुरू करण्याची मागणी केली. तसेच कंत्राटदार १ तास आधी पळाला, डॉक्टर नर्स गायब झाल्या, वैद्यकीय अधिकारी फोन उचलत नाहीत. लोकांचे हाल सुरू असून, स्थानिक आमदार बाळा नर यांनी घटनास्थळी भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भेटून घटनेची माहिती घेतल्याचे सांगत मी स्वतः महापालिकेच्या आयुक्तांशी बोललो आहे, असेही सांगितले.रुग्णांची सुरक्षितता आणि योग्य उपचार मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाला कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.