WhatsApp घेऊन येत आहे जबरदस्त फीचर्स; फोटो आणि व्हिडीओ एडिट करणं होणार सोपं

व्हॉट्सअप ॲप सध्या सर्वांसाठी वरदान ठरत आहे. या ॲपच्या माध्यमातून विचारांपासून,फोटो,व्हिडिओ, माहिती या सर्वांची देवाणघेवाण केली जाते. व्हॉट्सअपमुळे अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. जगभरात करोडो लोक व्हाट्सअपचा वापर करतात. व्हॉट्सअप हे सातत्याने काळानुसार आपल्यात बदल करत असते. अशात व्हाट्सअपने आता आपल्या वापरकर्त्यांसाठी नव्या फिचर्सची घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वी व्हाट्सअपने आपल्या वापरकर्त्यांसाठी पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी पेमेंट ऑप्शन सुरू केला होता. यानंतर आता नवनवीन फीचर्स व्हाट्सअपमध्ये समाविष्ट होणार आहेत. या फिचरची माहिती घेऊयात.
१.व्हॉट्सअप वरच करता येणार व्हिडिओ एडिटिंग:-
अनेकजण व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात. या स्टेटसमध्ये बराचदा व्हिडिओ देखील असतात. हा व्हिडिओ ठेवण्यासाठी अनेकांना व्हिडिओ एडिटिंगचे विविध ऍप्स वापरावे लागतात.मात्र,आता व्हॉट्सअपवरच व्हिडिओ एडिट करता येणार आहे.
२.ड्रॉइंग टूल:-
व्हॉट्सअप लवकरच आपल्या नवीन अपडेटमध्ये वापरकर्त्यांना ड्रॉईंग टूल्स देणार असून नवे पेन्सिल आयकॉन यामध्ये असणार आहेत. या मदतीने आपण चित्र रेखाटू शकतो. तसंच त्याच्या मदतीने फोटो किंवा व्हिडिओ फॉरवर्ड करण्याआधी त्यावर आपण एडिटिंग करू शकतो.
३.चॅट बबल कलर:-
व्हाट्सअपचे डेस्कटॉपवर वापरकर्त्यांना आता चॅट बबलचा अनुभव मिळणार आहे. याच्या मदतीने वापरकर्त्यांना थ्रीडी अनुभव मिळणार आहे.
४.नोटिफिकेशन मॅनेज पर्याय:-
व्हॉट्सअप वापरत असताना अनेक जण मेसेज करतात या मेसेजचे नोटिफिकेशन सातत्याने येत असतात. मात्र हे नोटिफिकेशन अनेकदा डिस्ट्रुबही करतात. मात्र आता वापरकर्त्यांना नोटिफिकेशन मॅनेज करता येणार आहेत.
असे नवनवीन फिचर व्हॉट्सअप्प बाजारात आणणार आहे.नवीन अपडेटमध्ये ही फिचर येणार असल्याची माहिती आहे.