राजकीय

जितेंद्र आव्हाडांनी अण्णा हजारेंना दिल्या हटके शुभेच्छा!;म्हणाले…

मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस आहे. अनेक राजकिय नेत्यांनी अण्णा हजारे यांना शुभेच्छा दिल्या. अण्णा हजारे आणि आंदोलन हे समीकरण फार मिळत जूळत आहे. तत्कालीन यूपीए सरकार असतांना अण्णा हजारे यांनी अनेक आंदोलने केली. महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी हे त्यांच्या आंदोलनाचे मुख्य विषय होते. जंतर-मंतर वर त्यांनी केलेल्या उपोषणामुळे काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर भाजपा सेत्तेत आल्यानंतर आण्णांची भुमिका बदलली का? अशी टीका त्यांच्यावर सतत होत असते. दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना चिमटा घेत शुभेच्छा दिल्या.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “प्रिय अण्णा…. प्रचंड महागाई ,पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती अर्थव्यवस्था, कोरोना मुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, वाढती सामाजिक दरी, चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांबद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता #HappyBirthdayAnna”

या शुभेच्छा राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. सतत सामाजीक प्रश्नांवर आंदोलनाचे ह्त्यार उपसणारे अण्णा हजारे आता गप्प का, असे लक्षात आणून देण्याचे काम जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षरीत्या केले आहे.

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईच्या भडक्याचे मोठे आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभे राहिले आहे. मे महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले. पेट्रोलचे दर देखील गगनाला भिडले आहेत.त्यामुळे विरोधी नेते केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपावर टीका करत आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!