कोंकणब्रेकिंग

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात ट्विटरवर घाणेरड्या भाषेत पोस्ट करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची शिवसैनिकांची मागणी

अन्यथा तीव्र भाषेत प्रत्युत्तर देण्याचा इशारा

रत्नागिरी: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात मुंबई येथील प्रदीप भालेकर यांनी ट्विटरवर घाणेरड्या भाषेत बदनामीकारक पोस्ट टाकली आहे या पोस्टमुळे शिवसैनिकांच्यात संताप निर्माण झाला आहे याबाबत शिवसेनेच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांना एक निवेदन देण्यात आले असून या निवेदनात असे म्हटले आहे की उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर मुंबई येथील प्रदीप भालेकर या व्यक्तीने घाणेरड्या भाषेत बदनामीकारक पोस्ट ट्विटरवर टाकून जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे अशा विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी व होणारी खोटी बदनामी थांबवावी.या निवेदनावर तालुका शिवसेनाप्रमुख म्हणून प्रदीप साळवी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय साळवी व शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांच्या सह्या आहेत

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तालुका शिवसेना प्रमुख प्रदीप साळवी यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावरील नाहक टीका व बदनामी सहन केली जाणार नाही असा इशारा दिला आहे अशा व्यक्तींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले याबाबत बोलताना उपजिल्हाप्रमुख बापू म्हाप यानी देखील संबंधित पोस्ट करणार्यांविरूध्द तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे या पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेमुळे शिवसैनिकांच्यात संतापाचे वातावरण असून अशी खोटी बदनामी करणाऱ्यांचा आपण निषेध व्यक्त करतो असे सांगितले तर शहरप्रमुख बिपिन बंदरकर यानेदेखील सदरची पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात जोरदार टीका केली असून अशा टीका करणार्यांवर त्याच भाषेत किंवा त्यापेक्षा तीव्र भाषेत उत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!