शाखा तिथे संविधान ह्या शिवसेना अभियानाची मुंबई येथून सुरुवात….

मुंबई; शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून “शाखा तिथे संविधान” या अभियानाची सुरुवात भारतीय संविधान दिनाच्या पूर्व संध्येला शिवसेनेचे मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रस्ताविका आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन करून शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषद सभापती निलमताई गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेनेचे प्रवक्ते व संयोजक किरण सोनावणे, माजी आमदार राम पंडागळे, शिवसेना मिडिया समन्वयक दिनेश शिंदे, विलास जोशी आदी उपस्थित होते.
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे या अभियानाच्या निमित्ताने म्हणाल्या की, भारतीय संविधान सर्वाना समान संधी, समान स्वातंत्र्य, समान न्याय आणि समान संधीची खात्री देते. शिवसेनाप्रमुख तर एकावेळी बोलताना म्हणाले होते की, न्यायालयात शपथ घ्यायची असेल तर ती संविधानावर हात ठेवून घेतली पाहिजे. या अभियानाने विरोधकांची तोंडे आपोआप बंद होतील जे संविधान बदलणार म्हणून कोल्हे कुई करत होते.
शाखा तिथे संविधान या अभियानाचे प्रमुख संयोजक आणि शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे म्हणाले की, शिवसेनेच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण असून शिवसेनेचा केंद्र बिंदू म्हणून ओळखले जाते त्या शिवसेनेच्या महाराष्ट्रातील तमाम शाखेत संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रतिमा आणि संविधानाची प्रत ठेवून संविधानिक मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, एक शायर असं बोलतो “दोस्त, कभी फुरसत मिले तो मुझे पढना, मुझमे तेरे हर उलझनो का समाधान है, मै कोई और नही, मै तेरे देश का संविधान हू ।
या अभियानाच्या अंतर्गत संविधान बाग, संविधान संग्राहलय, देशातील सर्व रेल्वे स्टेशन मध्ये संविधानाची प्रस्ताविका तसे आंतरराष्ट्रीय आणि देशी विमानतळावर संविधानाची उद्देशिका लावण्यासोबत, संविधानासाठी काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संघटना यांचा सन्मान, लोककलावंत यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येईल. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी आमदार राम पंडागळे यांनी केले.





