महाराष्ट्रकोंकण

मारहाण प्रकरणाचा राजकीय रंग; आमदार निलेश राणे संतापले!

 कुडाळ:सिंधुदुर्गात दोन दिवसापूर्वी एका पर्यटकाला कुडाळमधील झाराप झिरो पॉईंट येथे मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेला आता राजकीय रंग चढू लागला आहे. कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे आता आक्रमक झाले आहे. मारहाण करणाऱ्यांची आता जिरवण्याची वेळ आली आहे, 12 तारखेला एकत्र जमा, असं आवाहन निलेश राणे यांनी हिंदू बांधवांना केलं आहे. निलेश राणे यांनी म्हटलं की, “कुडाळमधील झाराप झिरो पॉईंट पर्यटक आणि टपरी चालक यांच्यात बाचाबाचीनंतर सर्व मुसलमानांनी एकत्र येत त्या पर्यटकाला मारहाण केली. एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपवून मारले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखला केला असून पाच पैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. चार जण फरार आहेत.

“पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे. 12 तारखेला मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी आहे ती काढून टाकणार आहे. कारण ती टपरी अनधिकृत आहे. पोलीस प्रशासनाकडे 48 तास आहेत. त्यांनी ती चहाची टपरी काढून टाकावी. चहाची टपरी वेळेत हलवली नाही तर आम्ही ती उखडून फेकून देऊ. कायद सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती माझी जबाबदारी नसेल”, असं आव्हान देखील निलेश यांनी पोलीस प्रशासनाला दिलं आहे.

“यांना आम्ही आता धडा शिकवला नाही तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी होईल. ती आम्ही सहन करणार नाही. येत्या 12 जानेवारीला सर्व हिंदू बांधवांनी कुडाळ येथे जमायचं आहे. आपण त्या गावात जाऊन मुस्लीमांनी कशासाठी केलं, त्यांना कसली ताकद दाखवायची होती, त्याची जिरवण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी”, असं देखील निलेश राणे यांनी केलं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!