महाराष्ट्र

देशभरातील मतदार नोंदणी पुनरावलोकनात मोठी प्रगती — ९९.७८% फॉर्म वितरण पूर्ण; डिजिटायझेशन ९०.१४%

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज (२ डिसेंबर २०२५) दुपारी ३ वाजता प्रसिद्ध केलेल्या डेली बुलेटिननुसार, देशभरात सुरू असलेल्या विशेष सघन पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR Phase II) प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ४ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२५ या कालावधीत सुरु असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत Enumeration Forms (EFs) च्या वितरणाचे प्रमाण ९९.७८% इतके झाले आहे, तर डिजिटायझेशनचे प्रमाण ९०.१४% नोंदवले गेले आहे.
राज्यानुसार प्रगती
डॉक्युमेंटनुसार, लक्षद्वीप, गोवा आणि पुडुचेरी या राज्यांत फॉर्म वितरणात १००% पूर्णत्व मिळाले आहे. तर उत्तर प्रदेशात डिजिटायझेशनची प्रगती सर्वात कमी म्हणजे ७९.०३% इतकी आहे.
राज्य फॉर्म वितरण फॉर्म डिजिटायझेशन
लक्षद्वीप 100% 100%
गोवा 100% 98.28%
राजस्थान 99.93% 98.54%
पश्चिम बंगाल 99.92% 97.34%
छत्तीसगड 99.85% 94.56%
तामिळनाडू 99.45% 94.32%
गुजरात 99.86% 91.45%
उत्तर प्रदेश 99.83% 79.03%
BLO – BLA संख्या
देशभरातील मतदार नोंदणी प्रक्रियेत
•5,32,828 BLOs (Booth Level Officers)
•12,43,201 BLAs (Booth Level Agents) सक्रिय असून, आयोगाने सर्व राजकीय पक्षांना आणखी एजंट नेमण्याचे आवाहन केले आहे.
 विशेष नोंद
•राजस्थानातील 193-अंटा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक असल्याने SIR प्रक्रिया ८ डिसेंबरपासून सुरू होणार.
•डिजिटायझेशनच्या आकडेवारीत डुप्लिकेट, मृत, स्थलांतरित किंवा अनुपस्थित मतदारांचेही तपशील सामील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!