महाराष्ट्र
मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी चुकीच्या पद्धतीने लोकांना छळले जात तर गुन्हा दाखल करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

मुंबई : तळागाळातील गरजू लोकांना कर्ज देणा या मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी चुकीच्या पद्धतीने लोकांना छळले जात आहे. सायंकाळी ६ नंतर कोणी कर्ज वसुलीसाठी गेले तर त्यांचयावर लगेचच गुन्हा दाखल करण्याची सूचना आपण दिली आहे, असे पालक मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेले कर्ज फेडायलाच हवे. मात्र सकाळी ९ ते सायंकाळी ६ हीच वसुलीची वेळ आहे. त्यानंतर वसुलीला जाणा यांवर तसेच मंजुरीपेक्षा जादा व्याजदर आकारणा या कंपन्यांवर तत्काळ गुन्हा दाखल केला जाणार आहे. अनेक महिलांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत.