गुड न्यूज: मुंबईत कोरोना ची दुसरी लाट लागली ओसरायला…
मुंबई,दि. २५.:राज्यातल्या १४ जिल्ह्यात कोरोना बाबतीत जरी रेड अलर्ट असला तरी मुंबईतून कोरोना ची दुसरी लाट ओसरत असल्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबईत मागील २४ तासात १०२९ रुग्ण बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर एकूण १४१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबईत ६ लाख ५५ हजार ४२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट आता ९२.७६ टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३४५ दिवसांवर गेला आहे.
राज्यात आज ३६,१७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण ५२,१८,७६८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आज राज्यात २४,१३६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज ६०१ कोरोना बाधित रुग्ण मृत्यू पावले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३५,४१,५६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,२६,१५५ (१६.७७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. .सध्या राज्यात २६,१६,४२८ व्यक्ती होम क्वारांटाईन मध्ये आहते तर २०,८२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईन केल्या गेल्या आहेत.