महाराष्ट्रकोंकण

वन खात्याची वानर, माकडे पकडण्याची मोहीम मंदावली

रत्‍नागिरी : गोळप, पावस परिसरातील वानर, माकडांचा उपद्रव कमी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यासाठी उपोषणेही केली; मात्र या परिसरातील वानर पकडण्याची मोहीम थंडावली आहे. ऐन आंबा, काजू हंगामाच्या तोंडावर ही मोहीम थांबल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत. वानर, माकडे यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आंबा, काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांना होत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी या संदर्भात गोळप येथील बागायतदार अविनाश काळे यांनी निवेदने दिली.

प्रसंगी उपोषणेही केली. त्यानंतर वानर, माकडे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली. पकडलेली माकडे जंगलात सोडण्यात येतात. त्याची सुरवात रत्नागिरी तालुक्यातून करण्यात आली. त्या वेळी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कोळंबे येथे वीस माकडे पकडण्यात आली होती. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांमध्ये या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.

या परिसरातील अनेक ठिकाणी वनविभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वानर, माकडे असल्याचे अहवालात नमूद केले आहे; परंतु या भागामध्ये अजूनही संबंधित विभागाने माकडे पकडण्यास सुरवात केलेली नाही. त्यामुळे आंबा, काजू हंगाम सुरू असताना वनविभागाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!