महाराष्ट्र
‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये सुरेश प्रभू यांची अभ्यागत प्राध्यापकपदी नियुक्ती

मुंबई:- राजकारणासोबतच शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची ब्रिटनमधील नामांकित अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटकल सायन्सच्या ‘ग्रँथम रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑन क्लायमेट चेंज अँड द एन्व्हायर्नमेंट’ या संस्थेमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
व्यवसायाने सनदी लेखापाल असलेले प्रभू हे १९९६ ला शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात दाखल झाले. त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. राजकारणाच्या १८ वर्षांच्या कारर्कीदीत त्यांनी पर्यावरण, वाणिज्य, रेल्वे ही महत्त्वाची खाती सांभाळली. जी २० राष्ट्रसमूहांच्या परिषदांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.