शिवसाई रहिवासी सेवा समिती, आप्पापाडा येथील समाज मंदिराचे लोकार्पण!
शिवसेना आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई – शिवसेना नेते, मुख्य प्रतोद, आमदार सुनिल प्रभु यांच्या आमदार निधी मधून प्रभाग क्रमांक ३८ मध्ये बांधण्याचा आलेल्या शिवसाई रहिवासी सेवा समिती, महाराष्ट्र नगर, आप्पापाडा येथील समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी करण्यात आला. शिवसैनिकांचे आद्य गुरू हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गुरू पौर्णिमेनिमित्त विविध प्रकारे समाजाची सेवा करून मानवंदना देतात. आणि याच पार्श्वभूमीवर आज शिवसाई रहिवासी सेवा समिती, महाराष्ट्र नगर, आप्पापाडा येथील समाज मंदिराचउद्घाटन सोहळा आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते पार पडला. या वास्तूमधून समाजसेवेचे काम होणार आहे.
यावेळी उपविभाग प्रमुख प्रदिप निकम, शाखा प्रमुख विजय गावडे, शाखा समन्वयक अंकिता चीपटे, कार्यालय प्रमुख शिवा पंडित सह समन्वयक सावित्री मेस्त्री, उप शाखा प्रमुख धोंडू जाधव, अनिल धनावडे, तेजस मिरगळ, दीपक कदम, दिगंबर सावंत, गणपत बंगे, चंद्रकांत कासार, महिला उपशाखा प्रमुख सुवर्णा सावंत सह उपशाखा प्रमुख सुनिता शेलार, ज्येष्ठ शिवसैनिक तानाजी महाडिक, प्रमोद पालांडे, शिवशाही रहिवासी संघ, महाराष्ट्र नगरच्या अध्यक्ष शिरीषकुमार अपकरे, सचिव एकनाथ चव्हाण, खजिनदार नंदकिशोर चव्हाण व रहिवासी उपस्थित होते.