“फुले” चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

मुंबई : मुंबई येथे महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी भेट घेतली , प्रत्येक चित्रपट तयार होताना सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेत असतो मात्र या चित्रपटात वस्तुस्थिती दाखवण्यात आली आहे. अनेक पुस्तकांचा आणि विविध उपलब्ध साधनांचा अभ्यास करूनच हा चित्रपट बनविण्यात आला असल्याचे मत चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी व्यक्त केले दिग्दर्शक अनंत महादेवन, निर्माते अनुया चौहान कुडेचा, निर्माते रितेश कुडेचा आणि सह निर्माते रोहन गोडांबे यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित हिंदी मध्ये हा चित्रपट येत आहे. त्यावर दिग्दर्शक आणि बाकी मंडळींनी बरीच मेहनत घेतल्याचे दिसते आहे त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पाहिलाच पाहिजे महात्मा फुलेंचं कार्य हे देशभर नाही तर जगभर आपण पोहोचवलं पाहिजे. – छगन भुजबळ