मुंबई
मुंबईत उद्या शनिवारी व परवा रविवारी लसीकरण नाही-मुंबई महानगरपालिकेचा निर्णय
मुंबई,दि.१४: गेल्या कित्येक दिवसांपासून लसीकरणासाठी धडपडणाऱ्या मुंबईकरांना उद्या आणि परवा म्हणजेच शनिवार आणि रविवारी लसीकरणापासून वंचीत राहावे लागणार आहे.
लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे महापालिकेला हा निर्णय घ्यावा लागला आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करणे जवळपास अशक्य झाल्याने ६० वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी महापालिके तर्फे सोमवार, मंगळवार व बुधवारी टोकन पध्द्तीचा (walk IN ) तसेच गुरूवार,शुक्रवार व शनिवारी नोंदणी नुसारच लस देण्याची पद्धत कालपासून सुरु करण्यात आली होती , मात्र तरीही अनेक केंद्रावरून ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागत होते. यात शनिवारी म्हणजे १५ तारखेला लसीकरण करण्यात येणार होते, मात्र आज सायंकाळी महापालिकेतर्फे उद्या १५ व १६ मे रोजी लसीकरण बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.