आता कोणत्याही कागदपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता नाही
सहदुय्यम निबंधकांची माहिती : नागरिक, बाँड विक्रेते, सेवा केंद्रांना सूचना
माजलगाव: शासकीय कार्यालय व न्यायालय यांच्यासमोर दाखल करावयाच्या व इतर सर्व प्रकारच्या बालाजी दारेवार प्रतिज्ञापत्रावर आणि शपथपत्रावर आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क शासन आदेशाने माफ करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही कागदपत्रासाठी मुद्रांक शुल्क (बाँड पेपर घेऊ नये) भरू नये, असे आवाहन सहदुय्यम निबंधक वर्ग-२ बालाजी दारेवार यांनी केले आहे.उच्च न्यायालय खंडपीठाच्या संदर्भ क्र.१ नुसार शासकीय कार्यालयात तसेच न्यायालयात प्रतिज्ञापत्र किंवा सादर करतानानागरिकांकडून मुद्रांकाचा आग्रह धरू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या शासनाकडून मिळणाऱ्या अनेक आहेत.त्यानुसार महाराष्ट्र शासन नोंदणी विभाग व मुद्रांक विभाग ३० ऑक्टोबरच्या आदेशानुसार जात प्रमाणपत्र,उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र,राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र,विवाह नोंदणी व शासनाकडून मिळणाऱ्या अनेक प्रमाणपत्रांसाठी तसेच शासकीय कार्यालयासमोर,न्यायालयासमोर दाखल करावयाच्या तसेच इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर व शपथपत्रांवर आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केले आहे.
मुद्रांकाऐवजी कोऱ्या कागदावर प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र घेण्यात यावे,असे सांगितले आहे.त्यामुळे सर्व मुद्रांक विक्रेते,महा-ई-सेवा केंद्र चालक,सर्व कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.त्याचप्रमाणे नागरिकांनीही वरील कामांसाठी लागणारे मुद्रांक शुल्क भरू नये,असे आवाहन बालाजी दारेवार यांनी केले आहे.






