महाकुंभ मेळ्यात गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा म्हणून महायज्ञ
प्रयागराज : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा म्हणून महायज्ञ होणार आहे. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याकडून या महायज्ञाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी कालावधीत महाकुंभमेळा होणार आहे. यादरम्यान गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा यासाठी महायज्ञाचे आयोजन करण्यात येणार आहे. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या शिबिरात आयोजित करण्यात आलेल्या या मंडपात ३२४ ‘कुंडे’ आणि ९ ‘शिखर’ आहेत. हा यज्ञ दररोज ९ तास याप्रमाणे महिनाभर चालणार आहे. या महायज्ञात ११०० पुरोहित सहभागी होणार आहेत. महाकुंभमेळा दर १२ वर्षांनी येत असतो. जानेवारी २०२५ मध्ये कुंभमेळा आला आहे. त्यापूर्वी २०१३ मध्ये कुंभमेळा पार पडला होता. प्रयागराज शहरात महाकुंभमेळा २०२५ ची तयारी पूर्ण क्षमतेने सुरू आहे.