महाराष्ट्रनवी दिल्लीमुंबई

अंतरिम जामीन देण्यास नकार देत हायकोर्टाने फेटाळली पूजा खेडकरची याचिका

नवी दिल्ली : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ट्रायल कोर्टाने पूजाला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. याविरोधात तिने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, हायकोर्टाने आज, सोमवारी तिची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे पूजाला कधीही अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी चौकशीची आवश्यकत आहे. तसेच याचिकाकर्त्याविरोधात एक भक्कम खटला उभार राहू शकतो, त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत आहे, असे सांगत कोर्टाने पूजा खेडकर हिची याचिका फेटाळून लावली. पूजा खेडकर हिच्यावर फसवणूक करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा तसेच ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने सांगितले की, याचिकाकर्त्याचे आचरण हे समाजातील वंचित समुहांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने प्रेरित आहे. मात्र त्या वंचित समुहांसाठीच्या तरतुदींचा लाभ घेण्यास पात्र नसल्याचे तपासामधून दिसून येत आहे. आलिशान वाहनांचे मालक असण्याबरोबरच याचिकाकर्त्याचे आई-वडील प्रभावशाली असल्याचे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले. तसेच पूजा खेडकर हिने उचलेली पावलं ही व्यवस्थेत फेरफार करण्याच्या एका मोठ्या कटाचा भाग होती. लाखो विद्यार्थी यूपीएसएसी परीक्षेसाठी उपस्थित असतात. या परिस्थितीत तिच्याकडून वापरण्यात आलेली रणनीती अनेक प्रश्न उपस्थित करते. फसवणुकीचं हे उदाहरण केवळ घटनात्मक संस्थाच नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक करणारे असल्याचेही हायकोर्टाच्या निरीक्षणात म्हंटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!