राष्ट्रीय

भारताची चीनवर मात, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे पाचव्यांदा विजेतेपद

नवी दिल्ली – भारतीय पुरुष हॉकी संघाने चीनचा १-० असा पराभव करून पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. पहिले तीन क्वार्टरमध्ये एक पण गोल झाला नव्हता, पण अखेर भारताने चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये शानदार गोल करत १-० अशी आघाडी घेतली, जी शेवटपर्यंत कायम राहिली. या विजयासह भारताने सुवर्ण, तर चीनने रौप्यपदक पटकावले आहे. विजेतेपदाच्या या लढतीत चीनने भारताला कडवी झुंज दिली. अंतिमचा एकमेव गोल चौथ्या क्वार्टरमध्ये झाला, जो भारताच्या जुगराज सिंगने केला, जो विजयासाठी पुरेसा ठरला. त्यामुळे चीनचे पहिले विजेतेपद हुकले. भारताने उपांत्य फेरीत कोरियाचा पराभव केला होता, तर चीनने उपांत्य फेरीत पाकिस्तानला मात देऊन अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले होते. पाकिस्तानने कोरियाचा 5-3 असा पराभव करून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तिसरे स्थान मिळवले.

या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगला गोल करता आला नसला तरी त्याने जुगराजला गोल करण्यात मोलाचे योगदान दिले. या सामन्यात चीनच्या बचावफळीनेही चांगली कामगिरी केली आणि भारताला बराच काळ गोल करण्यापासून रोखून धरले. या दरम्यान चीनला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र भारतीय बचावफळी आणि गोलरक्षकाने त्यांना गोल करण्याची एकही संधी दिली नाही. भारताने आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे पाचवे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी भारतीय संघ २०२३, २०१८ (संयुक्त विजेता), २०१६ आणि २०११ मध्ये चॅम्पियन ठरला होता. भारतानंतर पाकिस्तानने तीनदा आणि दक्षिण कोरिया एकदा विजेतेपद पटकावले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!