अनुवंशिक आजार जनजागृती परिषद

मुंबई / रमेश औताडे
वारस हक्काने संपत्ती मिळते तसे अनुवंशिक आजारही आपल्या शरीरात पूर्वजांकडून येतात. या अनुवंशिक आजाराची माहिती आपल्याला अगोदरच मिळाली तर आपल्याला होणारे संभाव्य आजार ओळखून त्याबाबत उपाययोजना केल्या जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर मुंबईत अनुवंशिक आजार परिषद मुंबईत नुकतीच पार पडली. अनुवंशिक आजार समजल्यामुळे रुग्णांना आजारांची शक्यता आधीच समजते, योग्य वेळी निदान होते आणि प्रत्येकासाठी वेगळे उपचार ठरवता येतात. त्यामुळे कुटुंबांना भविष्यातील आरोग्यधोक्या विषयी आधीच माहिती मिळते. असे अपोलो रुग्णालयांच्या उपाध्यक्षा डॉ. प्रीता रेड्डी यांनी सांगितले.
अपोलो रुग्णालयाने देशभरातील त्यांच्या केंद्रांमध्ये आतापर्यंत अकरा हजार रुग्णांची अनुवंशिक आजार आरोग्य तपासणी व सल्ला मार्गदर्शन केले असून हि जनजागृती अजून सुरूच राहणार आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, कोलकाता यांसह १२ शहरांत हि जनजागृती सुरू राहणार आहे. यावेळी अनुपम सिब्बल, सोहा अली खान, अरुणेश पुनेथा, डॉ. क्षितिजा, डॉ धवेंद्र कुमार उपस्थित होते.