मुंबईकोंकणमहाराष्ट्रराजकीय

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती

मुंबई : मागील काही दिवसापासून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरोधात विरोधी पक्षांकडून आरोप सुरू होते. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे शुक्ला यांच्या बदलीची मागणीही केली होती. दरम्यान, काल निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले. रिक्त महासंचालक पदासाठी फणसळकर यांच्यापाठोपाठ संजय कुमार वर्मा, सदानंद दाते आणि रितेश कुमार यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना काल, सोमवारी पदावरून हटवले. त्यानंतर रिक्त महासंचालक पदावर वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक असल्याने ते तात्काळ प्रभावाने पदभार स्वीकारतील.

याआधी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. आयपीएस संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. ते एप्रिल २०२८ मध्ये पोलीस सेवेतून निवृत्त होतील. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या डीजीपी पदासाठी त्यांचे नाव आघाडीवर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!