कोरोना ची लक्षणे वाटल्यास सर्वात आधी ‘हे ’ करा !
मुंबई, दि.४ : भारतात कोरोना ची दुसरी लाट आल्याचे जवळजवळ सिद्ध झाले आहे. अशा वेळेस मोठ्या प्रमाणावर हा रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी सर्वानी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोना ची लक्षणे दिसू लागताच सर्वप्रथम वैद्यकीय सल्ला घेऊन आपल्या छातीचा एक्स रे काढावा, त्यात कोविड चा पॅच दिसला की लगेचच HRCT किंवा छातीचा CT SCAN करून घ्या..
Pneumonia म्हणजे इन्फेक्शन मुळे फुफ्फुसातील ऑक्सिजन शोषणाऱ्या पिशव्यांना सूज येऊन त्यात म्हणजे पर्यायाने फुफ्फुसात INFECTED पाणी /कफ भरतो. HRCT किंवा छातीचा CT SCAN करताना फुफ्फुसाचे 25 भाग करून त्या पैकी किती भाग हे पाणी साठले आहे हे पाहून त्याचा SCORE काढतात. अर्थात जितका SCORE जास्त तितका ऑक्सिजन घ्यायला त्रास जास्त म्हणुन रक्तातील ऑक्सिजन ची पातळी कमी आणि पर्यायाने धोका जास्त.
Covid मध्ये Happy hypoxia नावाचा प्रकार पहायला मिळतो. म्हणजे वास्तविक पाहता ऑक्सिजन चे प्रमाण खाली येऊ लागले की रुग्ण अस्वस्थ होऊ लागतो त्याला धाप लागु लागते. Covid मध्ये मात्र अगदी 90% च्या खाली ऑक्सिजन आला तरी पेशंट अगदी सामान्य असू शकतो. हेच खरे कारण आहे पेशंट सिरियस झाला तरी पेशंट आणि नातेवाईकांना ते माहित होत नाही. आणि जेंव्हा लक्षात येते तेंव्हा पेशंट ICU किंवा Ventilator च्या परिस्थितीत पोहोचलेला असतो.
कोणत्या चुका होतात? आणि कारणे कोणती?
1. पहिली चूक तर सध्या संपूर्ण भारत करीत आहे.. मास्क, sanitizer social distancing न पाळणे. कारण.. कंटाळा, बेफिकीरी, अज्ञान
2. दुर्लक्ष… कारण.. बेफिकीरी
3. आजार अंगावर काढणे कारण भीती
4. साधारण पणे 6-7 व्या दिवशी पेशंट ला Pneumonia बसतो हे लक्षात ठेवा. काहींच्या मध्ये तो stable असतो मात्र काहींच्या मध्ये तो अतिशय वेगाने वाढतो.
उपाय.
1. सर्दी, ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब, डोकेदुखी, धाप लागणे, चव न कळणे, वास न येणे, हात पाय दुखणे यातील कोणतेही लक्षण दिसल्यास लगेच डॉक्टरांना भेटा. त्यांना तुमच्या पेक्षा जास्त अक्कल असते म्हणुन ते डॉक्टर आहेत.
2. वरील कोणतीही लक्षणे एकच दिवस होती आता काही होत नाही, मी बरा झालोय हा गैरसमज डोक्यातून काढा.
3. Vitamin C च्या नादाला लागून फळे, नारळाचे पाणी असले उद्योग करू नका.
4. ऑक्सिजन वारंवार मोजत रहा. 95 च्या खाली आला तर Emergency समजा.
5. Oxymeter क्रॉस चेक करा. चाइनीज मशीन काही ही रीडिंग दाखवतात.
6. Covid चा Virus देखील self limiting आहे. साधारणतः 14 दिवसांनी तो आपोआप संपून जातो. हे 14 दिवस आपल्या शरीराने आपली साथ द्यावी म्हणुन आयुर्वेदाचा सहारा घ्या.
7. मिथ्या अहंकार सोडा आणि सुरक्षित रहा
8.सेल्फ मेडीसिन टाळा




