गोडसेची भूमिका करणं म्हणजे गोडसेच्या प्रवृत्तीचं समर्थन करणं आहे का?अभिनेते नाना पाटेकर यांनी उपस्थित केला सवाल

मुंबई:- अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी साकारलेली नथुराम गोडसे यांची भूमिका सध्या राज्यात वादाचा विषय ठरत आहे. अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या नथुराम गोडसे यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.अश्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यात त्यांनी गोडसेची भूमिका करणं म्हणजे गोडसेच्या प्रवृत्तीचं समर्थन करणं आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच अमोल कोल्हे यांनी कोणती भूमिका करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
विशेष म्हणजे मीही नथुराम गोडसेची भूमिका केली होती, असंही नाना पाटेकर यांनी नमूद केलं आहे. दरम्यान अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या नथुराम गोडसे यांच्या भूमिकेवरून सोशल मीडियावर ही त्यांच्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत.