महाराष्ट्र

“महाराष्ट्राचा पाय एक्सलेटरवर, आधीच्या सरकारचा ब्रेकवर होता” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला ….

ऑरेंज गेट–मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते शुभारंभ

मुंबई : “महायुतीचा विकासाचा अजेंडा स्पष्ट आहे. आमचा पाय एक्सलेटरवर आहे; आधीच्या सरकारचा पाय ब्रेकवर होता,” अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
मुंबईतील महत्वाकांक्षी ऑरेंज गेट–मरीन ड्राईव्हT बोगदा प्रकल्पासाठी आज टनेल बोरिंग मशीनचा (TBM) शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर निशाणा साधला.

याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार अमीन पटेल यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, “मुंबईच्या विकासात महायुती सरकार कुठेही मागे नाही. आधी ब्रेक लावलेले प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केले. आता ब्रेकवर नाही, एक्सलेटरवर पाय ठेवून कामे होतात. त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आम्ही घेतलेले प्रकल्प निर्णायक ठरणार आहेत.”

ते पुढे म्हणाले की, ऑरेंज गेट–मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग ते किनारी मार्ग सहज जोडले जातील आणि मुंबई–नवी मुंबई प्रवास जलद व सुलभ होईल.
“मुंबईकरांचा वेळ वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि शहरातील ट्रॅफिकचा ताण कमी होईल. हा प्रकल्प खरोखरच गेम चेंजर आहे,” असे शिंदे म्हणाले.

पर्यावरणीय मुद्द्यांबाबत बोलताना शिंदे यांनी राजकारण करू नका, असे आवाहन करताना स्पष्ट केले. “आवश्यक तेवढीच झाडे तोडली जातात. अनावश्यक झाडतोड होणार नाही. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखूनच निर्णय घेतो.”

राजकीय मुद्द्यांवरून विरोधकांकडून येणाऱ्या टीकेवर प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले,
“महायुक्तीत तीनही पक्ष एकजुटीने काम करत आहेत. आमच्यात कोणतीही मतभेद मनभेद नाही. निवडणुकीत कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही स्वतः मैदानात उतरलो असल्याचे स्पष्ट केले.”

ठाम भूमिकेमुळे बोगदा प्रकल्पासह मुंबईतील अनेक महत्त्वाचे प्रकल्प वेगाने मार्गी लागले असून, “महायुती सरकार मुंबईकरांच्या विकासाच्या दिशेने वेगाने धावत आहे”, असे ते म्हणाले.
निवडणुकीत प्रक्रियेमध्ये लोकप्रतिनिधींनी कसं वागायला पाहिजे हे ठरवलं पाहिजे आणि निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही मार्गाने पूर्ण झाली पाहिजे. बोगस मतदान झाल्याचा आरोप करणारे काँग्रेस या निवडणुकीमध्ये कुठे होती असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!