मापात ‘पाप’ करणा-या व्यापा-यांवर वैध मापन विभागाची कारवाई,8 व्यापारी जाळ्यात

अलिबाग : पेण शहरातील भाजी, फळे, मटन, चिकन, मच्छी, मेडिकल व धान्य विक्रेते हे जुन्या व शासनाकडून प्रमाणित न केलेल्या वजनकाटयाचा वापर करुन ग्राहकांची लूट करीत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानुषंगाने 24 ते 27 मे 2021 या कालावधीत निरीक्षक वैध मापन शास्त्र, अलिबाग विभाग यांनी पेण शहरातील भाजी, फळे, मटन, चिकन, मच्छी, मेडिकल व धान्य विक्रेत्यांकडील वजनकाट्यांच्या अचानक तपासण्या केल्या.
या तपासणीत भाजी, धान्य, मटन, चिकन, मच्छी व मेडिकल इत्यादी 21 दुकानांचा समावेश आहे. या मोहिमेत वैध मापन शास्त्र, कायदा 2009 व त्याअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 8 व्यापाऱ्यांविरुध्द कारवाई केली आहे.
तरी वस्तू खरेदी करताना दुकानदारांकडून वजनात योग्य माल मिळत असल्याची खात्री करावी, प्रमाणित वजनाऐवजी दगडांचा वापर व्यापारी करीत असल्यास तसेच गंजलेल्या, फुटलेल्या व जुनाट वजनकाटयांचा वापर आढळल्यास अशा व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करु नये व याची सूचना निरीक्षक वैध मापन शास्त्र, अलिबाग विभाग, 1889, पाटील वाडी, चेंढरे, अलिबाग, जि. रायगड दूरध्वनी क्रमांक 02143-254498, व्हॉट्सअॅप नं. -9869691666, ई-मेल- [email protected] वर द्यावी, असे आवाहन वैध मापन शास्त्र, रायगड जिल्हा, पेण या कार्यालयाचे उप नियंत्रक, रा. फ. राठोड यांनी केले आहे.