बस चालवताना चालकाला अचानक आली फीट,बस अनियंत्रित होतेय पाहून महिलेनं सांभाळलं स्टिअरिंग अन्…

पुणे :- पुण्यातील एक महिला बस चालवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही म्हणाल यात नवल ते काय? तर वाचा. या माऊलीने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं शौर्य. महिलांचा ग्रुप पर्यटन करत असताना बस चालकाला अचानक फिट आली.
अशावेळी योगिता सातव यांनी धीराने बसचे स्टिअरिंग हाती घेतले आणि अनियंत्रित होऊ शकणारी बस तर ताब्यात घेतलीच,शिवाय बस चालकालाही रुग्णालयात दाखल केले.त्यांनी केलेली ही कामगिरी सध्या चर्चेत असून योगिता यांच्यावर कौतुकाता वर्षाव होतोय.या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे आणि तो प्रचंड चर्चेत सुद्धा आहे.
चालकाला ड्रायव्हिंग करताना फिट आल्यानंतर बसमधील योगिता सातव यांनी स्टिअरिंग व्हिल हातात घेत बस चालवली आणि चालकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं. जवळपास १० किलोमीटर पर्यंतचा प्रवास त्यांनी केला. वाघोली येथील योगिता सातव यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे चालकासह प्रवासी महिलांचेही प्राण वाचले.