उद्धव ठाकरेंचा अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय- वर्धापन दिनी एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
मुंबई : मुख्यमंत्रिपदासाठी, सत्तेसाठी जे लाचार झाले. ते काय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारसदार होणार? बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्त्वासाठी मतदानाचा अधिकारही गमावला. पण त्यांनी हिंदुत्त्व सोडलं नाही. पण बाळासाहेबांचे आम्ही वारसदार म्हणणाऱ्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता चांगलीच टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार झाले. त्यांनी हिंदुत्त्व बाजूला सोडून दिलं. महाराष्ट्रातील जनतेशी प्रतारणा केली. मतदारांना धोका दिला. आता निवडणुकीचं वारं दिसत असताना त्यांना पुन्हा हिंदुत्त्व, मराठी माणूस आठवत आहे, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला. 2019 साली मराठी माणसांचा विश्वासघात केला 2024 सालच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट फक्त 23 टक्के आहे. मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय. आपल्याकडे आत्मविश्वास आहे. त्यांच्याकडे अहंकार आहे. हा अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला. त्याच काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप कोणी केलं हे आपल्याला माहिती आहे.
सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कोणी केलं हेही आपल्याला माहिती आहे. त्यांनी 2019 साली मराठी माणसांचा विश्वासघात केला. महाराष्ट्राचा विश्वासघात केला. सरडाही रंग बदलतो. पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडादेखील महाराष्ट्राने पाहिला. त्यांचेच सगेसोयरे, भाऊबंद हे सांगत आहेत, अशी थेट टीका एकनाथ शिंदे यांनी केली. 2019 साली मराठी माणसांचा विश्वासघात केला 2024 सालच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट फक्त 23 टक्के आहे. मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय. आपल्याकडे आत्मविश्वास आहे. त्यांच्याकडे अहंकार आहे. हा अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला. त्याच काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप कोणी केलं हे आपल्याला माहिती आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कोणी केलं हेही आपल्याला माहिती आहे. त्यांनी 2019 साली मराठी माणसांचा विश्वासघात केला. महाराष्ट्राचा विश्वासघात केला. सरडाही रंग बदलतो. पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडादेखील महाराष्ट्राने पाहिला. त्यांचेच सगेसोयरे, भाऊबंद हे सांगत आहेत, अशी थेट टीका एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्रिपदासाठी ते लाचार झाले. ते काय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारसदार होणार. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्त्वासाठी मतदानाचा अधिकारही गमावला. पण त्यांनी हिंदुत्त्व सोडलं नाही. पण बाळासाहेबांचे आम्ही वारसदार म्हणणाऱ्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली. याला महाराष्ट्र साक्षीदार आहे. बाळासाहेब असते तर खुर्चीसाठी लाचार असणाऱ्या लोकांना त्यांनी उलटं टांगून खालून मिरचीचा धूर दिला असता. हिंदुत्त्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे ते आता उतावीळ, लाचार झाले आहेत, अशी थेट टीकाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.