
मुंबई,(प्रतिनिधी) समस्त कोकण व महाराष्ट्र वाट पहात असलेल्या व उद्यापासून सुरू होणार्या मुंबई-मडगांव वंदे भारत एक्सप्रेस ची पहिली फेरी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
शुक्रवारी 2 मे रोजी ओडिशाच्या बालासोरमध्ये कोरोमंडल एक्सप्रेसला भीषण अपघात होऊन झालेल्या जिवित हानी च्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधान मंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते होणारा 3 जूनचा लोकार्पणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
ही ट्रेन सोमवार 5 जून 2023 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान ही गाडी नियमितपणे सुरू केली जाणार होती. मात्र पुन्हा एकदा या ट्रेन चे उद्घाटन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज यानी प्रस्तुत प्रतिनिधी ला ही माहीती दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसची वाट पाहणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या आशेवर पुन्हा पाणी पडले आहे.