महाराष्ट्रकोंकणमुंबई

वरिष्ठ आयएएस बदल्या: राजेश देशमुख यांची एक्साईज आयुक्तपदी नियुक्ती, विजय सूर्यवंशींना कोकणची जबाबदारी!

मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात येत आहेत नुकत्याच राज्यातील ९ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असून आताही नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्य बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांची राज्य उत्पादन शुल्क आयुक् पदावर बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालय सचिव पदाचा अतिरिक् कार्यभारही सोपवण्यात आला आहे. तर राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांची बदली कोकण विभागाचे विभागीय आयुक्तपदी करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या बदल्या-

1. डॉ. विजय सूर्यवंशी (IAS: NON-SCS:2006) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. डॉ. राजेश देशमुख (IAS:SCS:2008) विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांना आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.

3. नयना गुंडे (IAS:SCS:2008) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची, महिला व बाल आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4. विमला आर. (IAS:SCS:2009) राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई यांची निवासी आयुक्त आणि सचिव, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

5. सिद्धराम सलीमठ (IAS:SCS:2011) जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. मिलिंदकुमार साळवे (IAS:SCS:2013) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

7. डॉ. सचिन ओंबासे (IAS: RR:2015) जिल्हाधिकारी, धाराशिव यांची सोलापूर महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8. लीना बनसोड (IAS:NON-SCS:2015) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांची आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

9. राहुल कुमार मीना (IAS:RR:2021) प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली, आणि सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, ZP, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!