मुंबई

सोनाक्षीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांना छातीला दुखापत, हॉस्पिटलमध्ये भरती

मुंबई – दिग्गज बॉलीवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिचा नुकताच विवाहसोहळा संपन्न झाला. सोनाक्षीच्या लग्नानंतर काहीच दिवसात शत्रुघ्न सिन्हा यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे त्यांचे चाहते चिंतेत आहेत. शत्रुघ्न यांच्या आजाराबाबत असा दावा करण्यात आला होता की 25 जूनला ते डायनिंग हॉलमध्ये घसरले होते आणि त्यांच्या छातीच्या हाडांना लागलं होतं. त्यांची सर्जरी झाली आहे असाही काहींनी दावा केला होता. काही दिवसांपूर्वी सोनाक्षी आणि तिचा पती जहीर यांना कोकिलाबेन इस्पितळातून बाहेर पडताना पाहण्यात आलं होतं. त्यामुळे सोनाक्षी गरोदर असल्याची अफवाही पसरली होती. आता मात्र शत्रुघ्न यांच्या प्रकृतीची अपडेट त्यांचा मुलगा लव याने दिली आहे. लवच्या खुलाशानंतर सगळ्याच अफवांना लगाम लागलाय.

शत्रुघ्न सिन्हाच्या इस्पितळात भरती होण्यामुळे त्यांचे चाहते फारच काळजीत होते. आणि ते शत्रुघ्नच्या प्रकृतीच्या अपडेटची वाट पाहत होते. आता शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा लव सिन्हा याने आपल्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या बातमीला पुष्टी दिली आणि आपल्या वडिलांच्या तब्येतीविषयी माहितीदेखील दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शत्रुघ्न सिन्हा यांना काही दिवसांपासून व्हायरल फिवर आणि अशक्तपणा होता. यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. लवने म्हटलं, “माझ्या वडिलांना खूप जास्त ताप होता आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला कारण ते लवकर बरे होऊ शकतील आणि आम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ शकू.

याआधीच्या रिपोर्टसनुसार असा दावा करण्यात आला होता की शत्रुघ्न सिन्हा डायनिंग रूममध्ये घसरुन पडले होते, ज्यामुळे त्यांच्या छातीला दुखापत झाली होती. त्यांच्या छातीत दुखणं सुरू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची त्वरित सर्जरी करुन घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!