जर्मनी येथे आयोजित “News9 Global Summit” कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदय सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.

महाराष्ट्र ; आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत-जर्मनी सहकार्य आणि संवादासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ म्हणून हे News9 Global Summit ” उल्लेखनीय ठरणार आहे. MIDC मार्फत परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांसाठी ५०० एकर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे, जेणेकरून तेही आपल्या मातृभूमीत उद्योग उभारू शकतील आणि मायदेशी परतू शकतील.
आज देशात होणाऱ्या गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. गेल्या काही वर्षांत, World Economic Forum (WEF) दावोस येथे महाराष्ट्राने ₹20 लाख हजार कोटींहून अधिक मूल्याच्या सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हे महाराष्ट्राच्या उद्योग धोरणांच्या यशाचे आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे मोठे उदाहरण आहे.
हा यशस्वी प्रवास सरकारने निर्माण केलेल्या पोषक उद्योग वातावरणामुळे शक्य झाला आहे – उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या विविध योजना, सबसिडी, प्रोत्साहनपर (Incentives) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगवान निर्णय प्रक्रिया यामुळे आज महाराष्ट्र जगातील आघाडीच्या गुंतवणूक केंद्रांपैकी एक बनला आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाइन उपस्थित होते तसेच माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, निती आयोगचे सदस्य व अर्थतज्ज्ञ अरविंद वीरमानी, TV9 CEO & MD वरून दास आदी मान्यवर उपस्थित होते.






