‘नाय वरणभात लोनचा’ वाल्या महेश मांजरेकरची झाली मांजर!
केंद्रीय व राज्य महिला आयोगाच्या दणक्यानंतर पत्करली शरणागती

मुंबई:- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा,कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या अश्लील ट्रेलर वर समाजमाध्यमातून व विशेषतः मराठी माणसांकडून टीकेची झोड उठल्यानंतर तसेच केंद्रीय व राज्य महिला आयोगाच्या नोटिसीनंतर मांजरेकर याने सपशेल शरणागती पत्करली असून, अश्लील दृश्ये वगळण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.
पौगंडावस्थेतील मुले व महिलांवरील आक्षेपार्ह दृश्ये चित्रित करण्यात आल्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने तसेच राज्य महिला आयोगाने महेश मांजरेकर याला नोटिसा बजावल्या होत्या व हे सीन्स काढून टाकण्याची मागणी केली होती.

दरम्यान महेश मांजरेकर यांच्या तर्फे प्रसिद्धीपत्रक काढून सादर ट्रेलर मधून तसेच २१ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या मूळ चित्रपटातून देखील सादर दृश्ये कापली असल्याचे सांगण्यात आले आहे. चित्रपटात अल्पवयीन मुलं असल्याने अनेक पालकांनीही यावर आक्षेप नोंदवला आहे.



