औषधांच्या गोळ्यांचा रंग-आकार वेगवेगळा का असतो? वाचा त्यामागील सायन्स..

आजारी पडलो की पहिली आठवण येते,ती डाॅक्टरांची. लवकरात लवकर ठणठणीत बरे होण्यासाठी डाॅक्टर आपल्याला तपासतात, गोळ्या-औषधे देतात. त्याचे सेवन केले की आपणही काही दिवसांत बरे होतो.
आजारी असताना खाल्ल्या जाणाऱ्या गोळ्या-औषधांकडे कधी निरखून पाहिलंय का? त्या वेगवेगळ्या रंगात का असतात, तसेच त्यांच्या आकारामागे नेमके काय सायन्स आहे? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील.चला तर मग आज आपण याबाबत जाणून घेऊ या..!
गोळ्यांचा रंग ठरतो कसा?
बऱ्याच गोळ्या पांढऱ्या असतात, पण काही गोळ्या वेगवेगळ्या रंगात असतात. गोळीचा रंग ती ज्या केमिकलपासून तयार होते, त्यापासून ठरतो. केमिकलचा रंग जसा असेल, तशाच रंगात गोळी तयार होते. गोळीच्या रंगावरूनही ती कोणत्या आजाराशी संबंधित असेल, याचा अंदाज लावला जातो.
गोळ्यांचे वेगवेगळे आकार का असतात?
गोळ्यांचा आकार ठरविताना खूप काळजी घेतली जाते. किती प्रमाणात डोस द्यायला हवा, यावर गोळीचा आकार ठरतो. गोळी गिळताना, ती घशात अडकू नये, यासाठी तिच्या कडा नेहमी गोलाकार बनवल्या जातात.
काही औषध कंपन्या त्यांच्या औषधांच्या मार्केटिंगसाठी गोळ्यांना वेगवेगळे आकार देतात. गोळ्यांचा आकारच संबंधित कंपनीची ओळख असते व त्या इतर कंपनीच्या गोळ्यांपेक्षा वेगळ्या दिसतात.