मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

सन्मानजनक मानधनासाठी ज्युनिअर आर्टिस्ट आक्रमक

मुंबई / रमेश औताडे : चित्रपट आणि मालिका क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी अत्यल्प मानधनाविरोधात आवाज उठवला आहे. आम्ही वर्षानुवर्षे फारच कमी मोबदल्यावर काम करत आहोत. आम्हाला किमान सन्मानजनक मानधन मिळावे व ” फिल्म वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉय ” च्या संभाव्य निवडणुका कायद्याप्रमाणे पार पाडाव्यात अशी आमची मागणी आहे. असे ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशन चे समिती प्रमुख सल्लागार ॲड यशवंत गंगावणे व अतुल मानकामे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

कलाकारांनी सांगितलं की, “आमचं योगदान संपूर्ण प्रकल्पाच्या गुणवत्तेसाठी अत्यावश्यक असते. मोठे निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून आम्हाला मानधनाची वेळेवर अंमलबजावणी होत नाही. असे अध्यक्ष अरविंद सकट, सचिव वसीम बेग, खजिनदार सरफुद्दीन शेख यांनी सांगितले. सरकारकडे आणि कामगार कल्याण मंडळाकडे देखील हस्तक्षेप करण्याची मागणी यावेळी उपाध्यक्ष गफूर शेख, सहसचिव तोसिफ शेख यांनी केली.

“आम्ही केवळ प्रसिद्ध चेहरे नाही, तर या इंडस्ट्रीचे आधारस्तंभ आहोत. आमचं शोषण थांबवलं गेलं पाहिजे,” असे समिती सदस्य अजीज खान, हुसेन शेख, रोहित ठाकूर, हैदर शेख, राजेंद्र गुलजार, अयुब खान, इमरान काझी यांनी सांगितले. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या प्रकरणात आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अध्यक्ष अरविंद सकट यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!