सावधान: सिंधुदुर्गातून गोव्यात येणाऱ्यांची होणार कडक तपासणी
कणकवलीत डेल्टा प्लसचा रूग्ण आढळल्याने प्रशासन सज्ज
सिंधुर्दुग : सिंधुदुर्गातून गोव्यात येणाऱ्यांची कडक तपासणी केली जाईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे दिली. तेथून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
गोव्यातील काहींना डेल्टा विषाणूचा संसर्ग झाला होता ही गोष्ट मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, कणकवली येथे एका व्यक्तीला डेल्टा प्लस या घातक विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे गोवा सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. सीमेवर कडक स्क्रिनिंग केले जाईल.
याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच फिरत्या प्रयोगशाळा पुरविण्याची विनंती केली तसेच गावोगावी कोरोनमुक्तीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
प्रारंभी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी या सातही जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर ०. १५ इतका कमी झाला आहे मात्र या सातही जिल्ह्यांचा दर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट आहे असे सांगितले.
रत्नागिरीत पहिल्या लाटेत ३०७४ रुग्ण तर दुसऱ्या लाटेत ५६०० रुग्ण, सिंधुदुर्गात पहिल्या लाटेत १३४६ तर सध्या ५५०० , हिंगोलीत पहिल्या लाटेत ६६० तर दुसऱ्या लाटेत ६७५ रुग्ण आढळले असून ही वाढ सावध करणारी आहे असे ते म्हणाले.