देशविदेशब्रेकिंग

कमला हॅरीस यांचा पराभव, अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार!

नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत झाली. या निवडणुकीत आधी जो बायडेन यांच्याशी ट्रम्प लढणार होते. मात्र, ऐनवेळी बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस व डोनाल्ड ट्रम्प या दोघांनाही अध्यक्षीय निवडणुकीसाठीच्या जनमत चाचणीमध्ये जवळपास समसमान विजयाची संधी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना पराभूत करून अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.

अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणीतून निकाल समोर येऊ लागले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस यांच्याविरोधात विजय मिळवल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, “हा आमच्यासाठी एक शानदार विजय आहे ज्यामुळे आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या विजयाबद्दल त्यांचं अभिननंद केलं आहे. ट्रम्प यांनी बहुमताचा २७० चा आकडा पार पडला आहे. त्यांना २७७ जागा मिळाल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी यापूर्वीच रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी घोषित केले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी २०१६ मध्ये हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात निवडणूक जिंकली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!