महाराष्ट्रमुंबई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरा – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, डॉ. झिशान हुसेन, इरफान पठाण ,नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड आदी उपस्थित होते.

निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे परंतु निवडणूक आयोगाचा सध्याचा कारभार पहात त्यांच्यावरचा विश्वास डळमळीत झाला आहे. मतचोरीसाठी सत्ताधारी पक्षाला मदत करून लोकशाहीवर घाला घातल्याचा प्रकार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी उघड केला आहे. निवडणूकीत गैरप्रकार होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातही निवडणुकीत गडबड झाल्याचे समोर आले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, या निवडणूकीत vvpat वापरणार नाही अशी भूमिका निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे परंतु निवडणुकीतील गैरप्रकार पहाता vvpat वापरावे अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!