राज्यात आज सार्वजनिक सुट्टी ; या गोष्टी बंद तर या राहणार सुरू

मुंबई:- गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावरील शोककळा पसरली. त्यांचं कला विश्वातलं योगदान पाहता केंद्र सरकारने दोन दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. तसंच राज्य सरकारमार्फत आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हे राहणार बंद:-
१.सरकारी कार्यालये
२.राष्ट्रीय बँका
३.शाळा
४.महाविद्यालय
५.केंद्रीय कार्यालये
हे राहणार सुरू:-
१.स्टॉक एक्सचेंज
२.रुग्णालये
३.अत्यावश्यक सेवा
४.भाजी,फळ मार्केट
५.पाणी पुरवठा आणि विद्युत वाहिन्यांसंबंधित कामं
६.खासगी क्षेत्र
महाराष्ट्रातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँकांसह सर्व शाळा आज बंद राहणार आहेत.तसंच केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला असल्याने या काळात कोणतेही सरकारी आणि शासकीय कार्यक्रम होणार नाहीत.
परक्राम्य संलेख अधिनियमानुसार ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.लता दीदींना या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.