नागराज मंजुळेंचा बहुचर्चित झुंड सिनेमाचा टिझर प्रदर्शित, बिग बी अमिताभ बच्चन झळकणार ‘अँग्री यंग मॅन’च्या भूमिकेत,पहा व्हिडीओ

मुंबई:- मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हिंदीतील पहिलावहिला सिनेमा म्हणजे ‘झुंड’.ज्येष्ठ अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयानं आणि संगीतकार अजय-अतुल यांच्या संगीताने हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशात या सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
या टिझरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असून अवघ्या काही तासात १५ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी या टिझरला प्रतिसाद दिला आहे. लॉकडाऊन आधी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता.मात्र, कोरोनामुळे सिनेमागृह बंद असल्याने या सिनेमाची प्रदर्शन तारीख पुढे ढकलण्यात आली होती. दिग्दर्शक नागराज मंजुळे हे पहिल्यांदाच हिंदी सिनेमासाठी दिग्दर्शन करणार असल्याने या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती.
हा सिनेमा ४ मार्च रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार असून बिग बी अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.दरम्यान त्यांच्यासोबत को-स्टार कोण असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.अजय-अतुलच्या संगीताचा तडका या सिनेमाला मिळाल्याने या सिनेमातील गाण्यांबाबतही उत्सुकता व्यक्त केली जात आहे.