कोंकणमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

“छबी” चित्रपटातलं “होय महाराजा” गाणं लाँच

मुंबई : कोकणाच्या पार्श्वभूमीवरील एक गूढरम्य कथा असलेल्या छबी या चित्रपटाच्या ट्रेलरनं चित्रपटसृष्टीसह प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण केली आहे. त्याबरोबरच आता सर्वांना ताल धरायला लावणारं “होय महाराजा” हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. आर्या आंबेकर, रोहित प्रधान यांनी गायलेलं हे गाणं रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. “छबी” हा चित्रपट २५ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. केके फिल्म्स क्रिएशन, उप्स डिजिटल एंटरटेन्मेंट यांनी “छबी” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जया तलक्षी छेडा निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांचं आहे. चित्रपटात ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश दाभाणे या नव्या दमाच्या कलाकारांसह समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, शुभांगी गोखले, राजन भिसे, संजय कुलकर्णी, लीना पंडित असे अनुभवी कलाकार आहेत.

“होय महाराजा” हे गाणं चित्रपटातील विवाहप्रसंगी होणाऱ्या हळदीच्या कार्यक्रमाचं आहे. सहजसोपे शब्द, ताल धरायला लावणारं संगीत, उत्तम नृत्य दिग्दर्शन या गाण्याला लाभलं आहे. त्यामुळे आता लग्न समारंभांमध्ये हे गाणं सहजपणे स्थान मिळवू शकणारं आहे यात शंका नाही. फोटोग्राफी स्पर्धेसाठी एक तरूण फोटोग्राफराला फोटो पाठवायचे असतात. त्यासाठी तो कोकणात जातो. त्याने कोकणात जाऊन एका मुलीचे फोटो काढलेले असतात. प्रत्यक्षात त्या फोटोत कुणीच दिसत नाही. पण, त्या फोटोग्राफरला त्या फोटोत मुलगी दिसत असते. या फोटोमागे काय कहाणी आहे, ती मुलगी कोण असते, या प्रश्नांची उत्तरं मोठ्या पडद्यावरच पाहायला मिळणार आहेत. निसर्गसंपन्न कोकणाच्या पार्श्वभूमीवरची एक गूढरम्य गोष्ट “छबी” या चित्रपटांतून मांडण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!