मंत्रालय

कोविड-19 मृत्यू पावलेल्या वारसांना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळामार्फत व्यवसाय कर्ज

अलिबाग,जि.रायगड : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली National Scheduled Castes and Development Corporation यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी Support for Marginalized Individuals for Livelihoods and Enterprise (SMILE) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे.

कोविड-19 या महामारीमुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती (Breadearner) मृत्यू पावली आहे, अशा कुटुंबातील प्रमुख वारसदारास राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली (एन.एस.एफ.डी.सी.), यांच्या मार्फत रु. 5 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना प्रस्तावित आहे.त्याचा सविस्तर तपशील यामध्ये खालीलप्रमाणे आहे.

 एन.एस.एफ.डी.सी. कर्ज रक्कम रु. 4.00 लाख, व्याज दर 6 टक्के, भांडवली अनुदान रक्कम  रु. 1.00 लाख.

मयत व्यक्तीची आवश्यक माहितीमयत व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात/पोटजात, मृत्यूचा दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला. कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या, कुटुंबातील प्रमुख वारसदार, कुटुंबातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न   रु. 3.00 लाखाच्या आत).

कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने या योजनेच्या माहितीकरिता महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट द्यावी तसेच दि.30 जून 2021 पर्यंत  http://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7  या लिंकवर माहिती भरावी, असे जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. रायगड यांनी कळविले आहे.          

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!