शैक्षणिक

मेथीची पानं आहेत इतक्या आजारांवर गुणकारी,वाचा सविस्तर

मेथीच्या भाजीचा अनेक घरांमध्ये आवर्जुन वापर केला जातो. मेथीची भाजी विविध प्रकारे बनवली जाते. काहींना त्याचे पराठे आवडतात. मेथीच्या पानांचा वापर मेथीच्या दाण्यांप्रमाणेच औषध म्हणून केला जाऊ शकतो. मेथीच्या पानांचे सेवन मधुमेह आणि हृदयाविकारांसह इतर अनेक आजारांमध्ये खूप फायदेशीर आहे.

मेथीच्या पानांमध्ये आयर्न, सेलेनियम, कॅल्शियम, मँगनीज, मिनरल्स आणि झिंकसारखे पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जाणून घेऊया हिच मेथीची पानं कोणत्या रोगांवर फायदेशीर आहेत. हिरवी मेथीची पाने टाइप १ आणि टाइप २ मधुमेहामध्ये साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मेथी खाल्ल्याने रक्ताभिसरणही सामान्य राहते. मेथीमुळे चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवण्यास आणि शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

मेथीच्या पानांमध्ये असलेले फायबर पचनक्रिया चांगली ठेवते. मेथीमुळे बद्धकोष्ठतेसारखे त्रासही कमी होतात. उच्च रक्तदाबावरही मेथीच्या पानांचा फायदा होतो. यामध्ये गॅलेक्टोमनन आणि पोटॅशियमची असल्याने रक्त परिसंचरण नियंत्रित राहते. मेथीची पाने खाल्ल्याने वजन कमी करण्यासही मदत होते. तसेच मेथीच्या पानांचा आहारात समावेश केल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटात अल्सर आणि आतड्यांमध्ये सूज येण्याची समस्या देखील कमी होते. मेथीच्या पानांचे सेवन केल्याने शरीरातील जळजळ कमी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!