नितेश राणेंना अटक होणार? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

मुंबई:- सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. यासंदर्भातील महत्त्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
दरम्यान २७ जानेवारीपर्यंत म्हणजे आजपर्यंत त्यांना अटक करण्यात येऊ नये असे आदेश सत्र न्यायालयामार्फत पोलिसांना देण्यात आले होते. अश्यात आज यावर सुप्रीम कोर्टातमध्ये सुनावणी पार पडणार आहे. आज सुप्रीम कोर्टात नितेश राणे यांच्या वतीने मुकूल रोहतगी युक्तिवाद करणार आहेत.
त्यामुळे नितेश राणेंना सुप्रीम कोर्टात तरी दिलासा मिळतो का हे पहावं लागेल. दिलासा न मिळाल्यास नितेश राणेंवर कारवाईची शक्यता आहे.त्यामुळे नितेश राणे यांना अटक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






